मने दुरावलेल्या सर्व नवराबायकोंना समर्पित...
मने दुरावलेल्या सर्व नवराबायकोंना समर्पित... आजकाल ते दोघे पहिल्यासारखे बोलत नाहीत.. रूसणं रागात बदललंय आणि त्यांना ते समजतच नाही.. एकाच घरट्यात राहतात दोन ओळखीचे पक्षी.. पण पहिल्यासारखी आता फुलत नाही गुलबक्षी.. टेन्शन्स् त्याची तिला कळत नाहीत.. आणि एकटेपणा तिचा त्याला उमगत नाही.. भुर्रकन् उडून गेले नवलाईचे नऊ दिवस.. पौर्णिमाही भासू लागली आता उदासवाणी अवस.. संसाराच्या वेलीवर फुलणार कसे फूल.. एकासाठी गुलमोहर आणि दुसर्यासाठी संसार म्हणजे फक्त चूल.. खरं तर अजून तिची उतरलीच नाही हळद पण तिच्या अल्ल्डपणातच तिचं सौंदर्य त्याला हे नाही कधीच कळत तो होवू पाहत आहे एक जबाबदार पती.. पण त्याच्या लक्षातच नाही आलं त्यामुळे कंटाळवाणी झाली संसाराची गती.. ती आजकाल वाट पाहते पुन्हा कधी फुटेल पालवी.. खिडकीतून पाहतानाही तिला आजकाल फक्त दिसते एकटेपणाची सावली.. सुखाच्या आहेत कल्पना दोघांच्याही वेगळ्या.. पण उमजतच नाही दोघांना की दोन्ही व्याख्या आहेत आगळ्या.. त्याचा आनंदच तिचं सारंकाही.. तिच्या हसण्यासाठी करेल तोही काहीबाही.. दोघेही ह...